marathi ukhane for groom
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

[BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019


मराठी उखाणे नवरदेवासाठी – Marathi ukhane for Groom

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

एक होती चिऊ, एक होता काऊ,
……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
…………. चे नाव घेतो……..च्या घरात.

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री,
… आज पासुन माझी गृहमंत्री.

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात

प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,

रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
… मिळाली आहे मला अनुरुप.

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
… माझी नेहमी घरकामात दंग,

मायामय नगरी, प्रेममय संसार, …
च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास,
मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *