marathi ukhane for groom
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

[BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019


मराठी उखाणे नवरदेवासाठी – Marathi ukhane for Groom

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
_____चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.

आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान,
_____चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,

देवळाला खरी शोभा कळसाने येते,
____ मुळे माझे गृहसौख्य दुनावते.

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती,
_____ माझ्या जीवनाची सारथी.

काही शब्द येतात ओठातून,
…… चं नाव येतं मात्र हृदयातून.

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

भाजीत भाजी मेथीची,
……माझ्या प्रितीची.

पुरणपोळीत तुप असावे साजुक,
……. आहेत आमच्या फार नाजुक.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……. आहे माझी ब्युटी क्वीन.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……..झाली आज माझी गृहमंत्री.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.


About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *