Marathi ukhane
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

[BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

Marathi Ukhane For Brides

 

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… …..रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
……… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,

धरला यांनी हात,वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.

नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,

पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,

चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. ….रावांचे नांव घेते,… ची सुन.

दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे…..रावांची राणी.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
…… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
…… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *