Marathi ukhane
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

[BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

Marathi Ukhane For Brides

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,……… …रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.
…..… रावांचे नांव घेते…… च्या दिवशी.

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…..…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,
………रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

गृह कामाचे शिक्षण देते माता,
….…रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… …रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
……. रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… ……रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

 

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…..…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी,
……रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…..…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
………रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
….… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
……. रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
…….. रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,
…….. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. …..रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
…… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
……. रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… ….रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
……. रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… …..रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
________रावांचे नांव घेते, …च्या घरात.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
……रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……. रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
……. रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
…… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… …..रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
…….रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
…… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
…… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
…… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… ….रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… ….रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
…….. रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
……. रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… …..राव हेच माझे अलंकार खरे.

पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… ….रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा

.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
……. रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
…… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… …रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *