Marathi ukhane
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

[BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

Marathi Ukhane For Brides

आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
—– रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे.

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
—– रावांचे नाव घेते लक्ष दया सारे.

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन,
……..रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.

इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग,
……..रावांच्या संसारात मी आहे हंग.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,
… . . ..रावांवर आहे माझा विश्वास.

प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,
……रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
….…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,
…..…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
….… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

करवंदाची साल चंदनाचे खोड,
……… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
…….… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा
………रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
………रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाट,
… रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात .

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,_____________रावांच्या सोबत आली मी सासरी.

गुलाबाच्या झाडाला फुल येतात दात
…रावांचे नाव घेते सोडा माझी वाट .

आकाशाच्या प्रगणनाt ब्रह्म , विष्णू आणि महेश ,………रावांचे नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश .

मंगळसूत्रातील दोन वाट्या संसार आणि महेर ,_____________रावांनी दिला सौभाग्याचा आहेर .

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,……..…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी .

पार्वतीने पण केला महादेवालाच वारीं,………रावांच्या साथीनं , आदर्श संसार करिन .

नंदा सौख्यभरे दिला सर्वानी आशीर्वाद ,………रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रास .

दोन जीवांचे मिलन , जणू शांत -जन्माच्या गाठी ,_______रावांचे नाव घेते तुमच्यासाठी .

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,………. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

 

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *